अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, उपचार सुरु

विकास समुद्रे याने मराठातील अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्येही कामं केली आहेत. विनोदी अभिनेता म्हणून मराठी मनोरंजनसृष्टीत विकास सुप्रसिद्ध आहे. लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती.

अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, उपचार सुरु

मुंबई : मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रे याला ब्रेन हॅमरेज झालं आहे. मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात विकासवर उपचार सुरु आहेत.

विकासला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विकासचं तात्काळ ऑपरेशन करण्यात आलं. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विकासला डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यासाठी त्याने साधारण उपचारही घेतले होते. मात्र गेल्या 3 दिवासांपासून डोकेदुखीचा त्रास वाढल्याने विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

विकास समुद्रे याने मराठीतील अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्येही कामं केली आहेत. विनोदी अभिनेता म्हणून मराठी मनोरंजनसृष्टीत विकास सुप्रसिद्ध आहे. लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती.

बातमीचा व्हिडीओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Marathi Actor Vikas Samudre suffers brain hemorrhage
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV