सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना विनंती करणार

सत्तेतून बाहेर पडल्यास पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नाही, अशी मराठवाड्यातील शिवसेना आमदारांची भूमिका आहे.

सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना विनंती करणार

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सत्तेतून बाहेर पडू नये, अशी मागणी मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंकडे करणार आहेत.

एकीकडे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना, मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंना भेटून सत्तेतून बाहेर न पडण्याची मागणी करणार आहेत. शिवसेना आमदार सुभाष साबणे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेतील.

सत्तेतून बाहेर पडल्यास पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नाही, अशी मराठवाड्यातील शिवसेना आमदारांची भूमिका आहे.

दुसरीकडे, येत्या दसऱ्याला जर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली, तर शिवसेनेत खिंडार अटळ असल्याचा पुनरुच्चार अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. शिवसेनेचे 20 ते 22 आमदार शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात न राहता भाजपसोबत असतील, असं रवी राणा म्हणाले.

 संबंधित बातम्या :

शिवसेनेने सत्ता सोडल्यास 20-22 आमदार 'वर्षा'वर : रवी राणा

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून भाजपला धारेवर धरणार!

सच्चा साथीदाराने सेना आमदार उदय सामंतांची साथ सोडली!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: mla Shivsena आमदार शिवसेना
First Published:

Related Stories

LiveTV