पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी

बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी

मुंबई: मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यसह देशभरात चर्चा सुरु आहे. मात्र आता तिकडे पाकिस्तानातूनही या मराठा मोर्चाला पाठिंबा मिळाला आहे.

बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.  ‘मराठा ट्राईब’ या फेसबुक पेजवर पाठिंबा देणारी पोस्ट करण्यात आली आहे.

मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण द्यावं, अशी मागणी ‘मराठा कौमी इतेहाद’ने केली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

“ ‘मराठा कौमी इतेहाद’ हे भारतातील मराठा मोर्चाला पूर्ण पाठिंबा देत आहे.  मराठा समाजावर अन्याय होत आहे, त्याचा मी निषेध करतो.  मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळायलाच हवं. तो त्यांचा राष्ट्रीय हक्क आहे. त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सहभागी आहोत. पाकिस्तानातील मराठ्यांना न्याय मिळतो, मग भारतातील मराठ्यांना का नाही?  पाकिस्तानातील मराठा समाज याचा तीव्र निषेध करतो”.

प्रमुख, ‘मराठा कौमी इतेहाद’ (पाकिस्तान)


वदेरा दिन मोहम्मद मराठा बुगटी


कोण आहेत पाकिस्तानातील मराठे?

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मराठ्यांना अफगाणिस्तानमध्ये नेलं जात होतं. पण ते शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांना बलुचिस्तानात ठेवण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर झालं. पण त्यांनी त्यांच्या नावात मराठा नाव अजूनही जोडलेलं आहे. मराठा असण्याचा त्यांना अभिमान आहे.


संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट : बलुचिस्तानचा मराठा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV