महिला असल्याचं भासवून फेसबुकवरुन 15 महिलांना गंडा

धुळ्याचा रहिवासी असलेल्या भिकन नामदेव पालांडेने महिला असल्याचं भासवून फेसबुकवरुन 15 महिलांना गंडा घातला

महिला असल्याचं भासवून फेसबुकवरुन 15 महिलांना गंडा

मुंबई : महिला असल्याचं भासवून फेसबुकवरुन महिलांना गंडा घालणाऱ्या 37 वर्षीय पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या भावासोबत लग्न करुन देण्याचं आश्वासन देऊन त्याने अनेक जणींकडून पैसे, दागिने उकळले होते.

धुळ्याचा रहिवासी असलेला भिकन नामदेव पालांडे यांचं लग्न झालेलं असून त्याला दोन मुलंही आहेत. मुंबईत सहा पोलिस ठाण्यांमध्ये जवळपास 15 महिलांनी पालांडेविरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. 'मिड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

भिकन मुख्यत्वे विधवा महिलांना हेरायचा. फेसबुकवर महिलेच्या नावे तयार केलेल्या फेक अकाऊण्टवरुन तो महिलांशी मैत्री करायचा. आपल्या भावासोबत लग्न करुन देण्याचं आमिष तो दाखवत असे. 'माझ्या भावाला घटस्फोटासाठी पैशांची गरज आहे' असं बतावणी करुन तो संबंधित महिलांकडून पैसे उकळायचा.
फेसबुकवर मैत्री महागात, अकोल्यातील महिलेला 48 लाखांचा गंडा

महिला अनोळखी महिलेवर चटकन विश्वास ठेवत असल्याचा फायदा भिकनने घेतला. पैसे घ्यायला जाताना मात्र तो काहीतरी कारण द्यायचा आणि पुरुष म्हणूनच भेट घ्यायचा.
पुरुष असल्याची बतावणी, महिलेशी लग्न, तरुणीला अटक

पालांडेने बोरिवलीतील एका महिलेशी फेक प्रोफाईलवरुन चॅटिंग सुरु केल्याचा सुगावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना लागला. आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी संबंधित महिला महत्त्वाचा दुवा ठरली. भिकनला मुंबईतील मानखुर्द पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Married man posing as woman cheats 15 ladies on Facebook latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV