ट्वेन्टी 20 मुंबई लीगला सुरुवात, सहा संघांमध्ये टक्कर

या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, तसंच युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ हेसुद्धा वेगवेगळ्या संघातून सहभागी होणार आहेत.

ट्वेन्टी 20 मुंबई लीगला सुरुवात, सहा संघांमध्ये टक्कर

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत मुंबईतील सहा संघांचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या धर्तीवर ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईतील स्थानिक खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे.

11 ते 21 मार्चदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, तसंच युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ हेसुद्धा वेगवेगळ्या संघातून सहभागी होत आहेत.

रहाणे, सूर्यकुमारवर सर्वाधिक बोली

आयकॉन खेळाडूंसाठी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव सगळ्यात महागडे खेळाडू ठरले. रहाणे आणि सूर्यकुमार यांना अनुक्रमे मुंबई नॉर्थ आणि मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक म्हणजे सात लाख रुपयांची बोली लावण्यात आली.

रोहित शर्माला सहा लाखांची बोली लावत मुंबई नॉर्थ वेस्ट संघाने विकत घेतलं. तर श्रेयस अय्यरवर मुंबई नॉर्थ सेंट्रल संघाने पाच लाखांची बोली लावली.

सचिन तेंडुलकर MCA च्या ट्वेन्टी 20 मुंबई लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर


अभिषेक नायर आणि सिद्धेश लाडचा त्यांच्या मूळ किंमतीत म्हणजेच चार लाखात मुंबई साऊथ आणि मुंबई साऊथ वेस्ट संघाचे आयकॉन खेळाडू या नात्याने समावेश करण्यात आला. मुंबई रणजी संघाचा कर्णधार आदित्य तरे मात्र या आयकॉन खेळाडूंच्या लिलावात अनसोल्ड ठरला होता.

सचिन ब्रॅण्ड अँबेसेडर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा या टी ट्वेन्टी मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँबेसेडर आहे. लीग कमिशनर म्हणून दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई क्रिकेटमधल्या स्थानिक स्पर्धांचा ढाचा हा भारतीय क्रिकेटमध्ये मजबूत मानला जातो. पण अशा स्पर्धांमधून खेळाडूंना आर्थिक लाभ होत नाही. ट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीगमधून खेळाडूंना थेट आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MCA T20 Mumbai League latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV