आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण!

फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकलिंग हे अवघ्या 14 तास 8 मिनिटात पूर्ण केलं.

By: | Last Updated: > Monday, 9 October 2017 12:27 PM
Meet Ironman IPS Krishna Prakash, After Milind Soman, Krishna Prakash completes ‘iron man’ challenge in France & Becomes 1st Indian Civil Servant To Finish Ironman Triathlon

मुंबई: जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी  जिंकली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत.

आयजी कृष्णप्रकाश आता आयर्नमॅन कृष्णप्रकाश बनले आहेत.

फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकलिंग हे अवघ्या 14 तास 8 मिनिटात पूर्ण केलं.

सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता ‘आयर्नमॅन’, सर्वात अवघड ‘ट्रायथलॉन’चं जेतेपद 

ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 17 तासांचा अवधी असतो, मिलिंद सोमण यांनी 15 तासात पूर्ण केली होती. मात्र आता कृष्णप्रकाश यांनी त्यांच्याही पुढे मजल मारली आहे.

ट्रायथलॉन म्हणजे काय?

ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं.

वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. ‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 17 तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं.

कोण आहेत कृष्णप्रकाश?

कृष्णप्रकाश हे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महत्त्वाची पदं सांभाळली आहेत.

त्यांची 2012 मध्ये मुंबईत अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभाग म्हणून बदली झाली.

IRONMAN Triathlon 3

मुंबईतील दक्षिण विभागातच दरवर्षी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. ही स्पर्धा आझाद मैदना-वरळी-आझाद मैदान अशी होते. या स्पर्धेत देश-विदेशातील हजारो स्पर्धक भाग घेतात. या स्पर्धेचं नियोजन करणं म्हणजे पोलिसांसाठी मोठी कसरत असते.

मात्र 2013 मध्ये कृष्णप्रकाश यांनी या स्पर्धेचं नियोजन अगदी सहज केलं होतं. कृष्णप्रकाश यांच्या त्यावेळच्या मुंबई हाफ मॅरेथॉनची कहाणी अगदी भन्नाट आहे.

जिममध्ये ठरलं, हाफ मॅरेथॉन पूर्ण करायचं

कृष्णप्रकाश हे एकदा जिममध्ये गेले असता, त्यावेळी तिथे पोलीस महानिरीक्षक (आयजी) अमिताभ गुप्ता आणि तत्कालिन उत्तर विभागाचे अतिरिक्त अधिक्षक विश्वास नांगरे पाटील हे सुद्धा होते.

सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता ‘आयर्नमॅन’, सर्वात अवघड ‘ट्रायथलॉन’चं जेतेपद 

त्या दोघांसोबतच्या गप्पांदरम्यान हाफ मॅरेथॉनची चर्चा झाली. ते दोघे या स्पर्धेत धावणार होते, ते ऐकून कृष्णप्रकाश यांनीही त्या स्पर्धेत धावण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता की त्याच स्पर्धेचं नियोजन, सुरक्षेची जबाबदारी कृष्णप्रकाश यांच्यावरच होती.

धावून आले, वर्दी चढवली

त्यामुळे स्वत:वरची जबाबदारी पूर्ण करायची की स्पर्धेत धावायचं अशी द्विधा अवस्था कृष्णप्रकाश यांची झाली होती.

मग कृष्णप्रकाश यांनी तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह आणि सहआयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली.  त्यावेळी दोघांनी हसून सांगितलं होतं की मॅरेथॉनही तुमचीच आणि सुरक्षाही तुमचीच.

IRONMAN Triathlon

यानंतर मग जानेवारी 2013 मध्ये कृष्णप्रकाश यांनी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन, ती स्पर्धा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलीस क्लबमध्ये जाऊन पोलीस युनिफॉर्म घातला होता.

यानंतर ते प्रत्येक वर्षी या स्पर्धेत धावतात.

आयपीएसचा फोन, फुल मॅरेथॉन धावण्याचा निर्णय

यानंतर मग यावर्षी जानेवारी 2017 मध्ये झारखंडच्या आयपीएसचा कृष्णप्रकाश यांना फोन आला. त्यांनी आपण मुंबईला मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी येत असून, आझाद मैदान परिसरात रुम बूक करण्याची विनंती केली. त्यावेळी कृष्णप्रकाश यांनी आझाद मैदानात का, हाफ मॅरेथॉन तर वरळीतून सुरु होते, त्यामुळे मी वरळीत रुम बूक करतो, असं सांगितलं. त्यावेळी झारखंडच्या आयपीएसने आपण हाफ नाही तर फुल मॅरथॉनमध्ये धावणार असल्याचं सांगितलं.

IRONMAN Triathlon 2

यानंतर मग कृष्णप्रकाश यांनीही आपण का हाफ मॅरेथॉनमध्ये धावायचं, मी सुद्धा फुल मॅरेथॉनमध्ये धावणार, असं जाहीर केलं आणि ते धावू लागले.

ट्रायथनॉलमध्ये धावण्याचा निर्णय

कृष्णप्रकाश यांनी नाशिकमधील मालेगावातही सेवा बजावली आहे. त्यामुळे ते मालेगाव मॅरेथॉनमध्येही धावतात. एकदा मालेगावातील एका कार्यक्रमात त्यांची ओळख एका डॉक्टरशी झाली. त्या डॉक्टरांनी आपल्या 23 वर्षीय मुलाने फ्रान्सच्या हॉफ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतल्याचं सांगितलं. हे ऐकून कृष्णप्रकाश यांनी फुल ट्रायथलॉन स्पर्धेत धावण्याच निर्णय घेतला.

अल्पावधित स्पर्धेची तयारी

फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतल्यानंतर, कृष्णप्रकाश यांनी ऑनलाईन रजिस्टर केलं.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्याकडे स्पर्धेच्या तयारीसाठी केवळ साडेतीन महिने होते. यामध्ये त्यांना धावणे, सायकलिंग आणि स्विमिंग या सर्व पातळ्यांवर तयारी करायची होती.

IRONMAN Triathlon 1

कृष्णप्रकाश रात्री दहाला झोपून पहाटे चार वाजता उठून प्रॅक्टिस सुरु करत असत. रविवारी तर दह-बारा तास ते सरावच करत. सर्व तयारीनंतर ते ऑगस्ट महिन्यात फ्रान्समध्ये पोहोचले. तिथेही स्पर्धेच्या आधी त्यांनी सराव केला. मात्र थकवा जाणवू नये, यासाठी त्यांनी कवितांचा आधार घेतला. त्यांनी स्वत: कविता लिहिल्या.

चाक खड्ड्यात गेलं, कृष्णप्रकाश कोसळले

या स्पर्धेत 180 किलोमीटर सायकलिंग करायचं असतं. सायकलिंग करत असताना कृष्णप्रकाश यांच्या सायकलचं चाक खड्ड्यात गेलं आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते काही क्षण त्यांना भोवळ आल्यासारखं झालं. त्यावेळी सहकारी सायकलपटूंनी त्यांच्या तोंडावर पाणी मारुन उठवलं.

मग कृष्णप्रकाश यांनी पुन्हा सायकलिंग सुरु केलं. मात्र त्याचवेळी त्यांच्यापुढे वेळेचं आव्हान होतं. कारण स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही एकाच स्पर्धकाच्या मागे सलग 12 मिनिटे राहू शकत नाही. त्यामुळे कृष्णप्रकाश हे एकामागोमाग एकाला ओव्हरटेक करत गेले.

संबंधित बातमी

सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता ‘आयर्नमॅन’, सर्वात अवघड ‘ट्रायथलॉन’चं जेतेपद 

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Meet Ironman IPS Krishna Prakash, After Milind Soman, Krishna Prakash completes ‘iron man’ challenge in France & Becomes 1st Indian Civil Servant To Finish Ironman Triathlon
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रुझमधील फेरीवाले हटवले
मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रुझमधील फेरीवाले हटवले

मुंबई : मनसेची मुंबईतील स्थानकांबाहेरच्या फेरीवाल्यांविरोधातील

मुंबईत कुर्ल्यामध्ये मध्यरात्री 8 ते 9 रिक्षांची तोडफोड
मुंबईत कुर्ल्यामध्ये मध्यरात्री 8 ते 9 रिक्षांची तोडफोड

मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात 8 ते 9 रिक्षांची तोडफोड केल्याची घटना

मारायचंच असेल तर मनसेने सीमेवर पाक सैनिकांना मारावं : आठवले
मारायचंच असेल तर मनसेने सीमेवर पाक सैनिकांना मारावं : आठवले

मुंबई : मनसे कार्यकर्त्यांना कोणाला मारायचंच असेल, तर त्यांनी

राज ठाकरेंकडून परप्रांतियांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप
राज ठाकरेंकडून परप्रांतियांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातील रेल्वे

मध्य-पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर-ट्रान्सहार्बरची सुटका
मध्य-पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर-ट्रान्सहार्बरची सुटका

मुंबई : मुंबईत हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे
फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी

मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला
मुंबईत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूहल्ला

मुंबई : राजधानी मुंबईत महिला अत्याचाराच्या एकाच दिवसात दोन घटना

मुंबईत छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला मारहाण, आरोपी अटकेत
मुंबईत छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला मारहाण, आरोपी अटकेत

मुंबई : कुर्ल्यातील अल्पवयीन मुलीला मारहाण करुन बेशुद्ध करणाऱ्या

मेट्रो 7 चं काम सुरु असताना पिलर कोसळला
मेट्रो 7 चं काम सुरु असताना पिलर कोसळला

मुंबई : मेट्रो 3 चं काम सुरु असताना पिलर कोसळून एक कामगार जखमी झाला

ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड
ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड

ठाणे : रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात