मुंबई लोकल : तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर आज (17 डिसेंबर) सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई लोकल : तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर आज (17 डिसेंबर) सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरील बोईसर-वाणगाव रेल्वेस्थानकांदरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेट, वांद्रे, बोरिवली आण‌ि विरार येथून डहाणू तसेच गुजरातकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वे : बोरिवली ते नायगाव या रेल्वेस्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, हा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. अप आणि डाऊन स्लो अशा दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने, विरार-वसई ते बोरिवली-गोरेगाव दरम्यानची अप आणि डाऊन स्लोवरील वाहतूक फास्ट मार्गावरुन चालवली जाईल. त्याचप्रमाणे, काही लोकल रद्दही केल्या जातील.

मध्य रेल्वे : मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप फास्ट रेल्वेमार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे यादरम्यानच्या लोकल अप स्लो मार्गावर धावतील. ठाणे आणि सीएसएमटीपर्यंतच्या सर्व लोकल दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या रेल्वेस्थानकात थांबतील. शिवाय सकाळी 10.16 ते दुपारी 3.22 वाजेपर्यंतच्या सर्व डाऊन फास्ट लोकल किमान 15 मिनिटे तरी उशिराने असतील.

हार्बर रेल्वे : हार्बर रेल्वेच्या नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या दरम्यान दुरुस्तीची कामं पार पाडली जाणार आहेत. हार्बर रेल्वेमार्गावरील अप आणि डाऊन गाड्या सकाळी 11.6 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत नेरुळ ते पनवेलदरम्यान बंद असतील. ट्रान्सहार्बरवरील लोकलही सकाळी 11.2 ते दुपारी 4.26 वाजेपर्यंत पनवेल ते नेरुळदरम्यान बंद असतील. तसेच, पनवेल-अंधेरी लोकलही या वेळेत बंद असतील. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी ते नेरुळ आणि वाशी या रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.

बोईसर-वाणगाव दरम्यान पॉवर ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील बोईसर-वाणगाव रेल्वेस्थानकांदरम्यान आज दुरुस्तीच्या कामासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चर्चगेट, वांद्रे, बोरिवली आण‌ि विरार येथून डहाणू तसेच गुजरातकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या जातील.

वांद्रे येथून सकाळी सव्वा नऊला सुटणारी वापी पॅसेंजर तसेच विरारहून सकाळी 11.25 ला सुटणारी वलसाड-शटल, विरारहून सकाळी 11.58 वाजता सुटणारी विरार-डहाणू रोड लोकल या डाऊन गाड्या तसेच डहाणूहुन सकाळी 10.5 ला सुटणारी डहाणू-विरार लोकल, वापीहून 1.55 ला सुटणारी वापी-विरार शटल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बोरिवलीहून सकाळी 10.31 ला सुटणारी बोरिवली-डहाणू लोकल, तसेच विरारहून सकाळी 11.27 ला सुटणारी विरार-डहाणू लोकल या गाड्या पालघरपर्यंत धावतील. पालघरहून दुपारी 1.17  वाजता चर्चगेटच्या द‌िशेने जाणारी लोकल सुटेल आणि पालघरहून दुपारी 1.55 वाजता विरारकडे जाणाऱ्या लोकल सुटतील.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mega block on Western, Central and Harbor Rail in Mumbai Latest Updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV