मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅकची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल आणि सिग्नलिंगच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅकची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल आणि सिग्नलिंगच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्यरेल्वेच्या मुख्य लाईनवर कल्याण-दिवा स्थानकांदरम्यान फास्ट मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 04.15 वाजेपर्यंत, हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल-नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत, तसंच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मध्यरेल्वेच्या मुख्य लाईनवर अप फास्ट मार्गावर कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 04.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या स्थानकांदरम्यानची वाहतूक अप स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे. मेगाब्लॉकमुळे मध्यरेल्वेची वाहतूक उशिराने धावेल, तसंच काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल ते नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मेगाब्लॉकच्या काळात पूर्णपणे बंद असेल.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉकच्या काळात स्लो मार्गावरील वाहतूक या स्थानकांदरम्यान फास्ट लाईनवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने चालेल. काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: megablock on all three railway lines in mumbai latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV