मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक

मुंबईत आज मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असेल. दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज कोणताही मेगाब्लॉक नसेल.

मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईत आज मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असेल. दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज कोणताही मेगाब्लॉक नसेल.

मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुंलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवरील अप फास्ट मार्गावरील वाहतूक अप स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे, त्यामुळे मेगाब्लॉक दरम्यान  सकाळी 10.37 पासून दुपारी 3.56 पर्यंतच्या फास्ट मार्गावरील लोकल दिवा ते परेल स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने धावतील.

मेगाब्लॉकमुळे रत्नागिरी दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावेल, तर दादर रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून निघेल. प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-दिवा स्थानकांदरम्यान विशेष लोकल सोडण्यात येईल.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद असेल. मेगाब्लॉकच्या काळात पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हार्बरचे प्रवासी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतील.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: megablock on central and harbour lines in mumbai suburbs latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV