मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळ मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळ मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेची डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक डाऊन फास्ट मार्गावरुन वळवण्यात येईल.

त्यामुळे मुलुंडहून निघणाऱ्या डाऊन स्लो आणि सेमी फास्ट लोकल सकाळी 10.47 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. डाऊन स्लो मार्गावरील लोकल कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाण्यातून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसंच अप फास्ट मार्गावरील कल्याणहून सुटणाऱ्या लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 03.06 वाजेपर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात थांबतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल ते नेरुळमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.30 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक सकाळी 10.03 ते दुपारी 04.34 वाजेपर्यंत नेरुळ ते पनवेलमध्ये बंद असेल.

मेगाब्लॉकमुळे ट्रान्सहार्बरवरील ठाणे-पनवेल वाहतूकही सकाळी 11.02 ते दुपारी 04.26 वाजेपर्यंत बंद असेल. ब्लॉकच्या काळात अंधेरी ते पनवेल मार्गावरील हार्बरची वाहतूक बंद राहील. तसंच या वेळेत सीएसएमटी ते वाशी आणि नेरुळदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर मेगाब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावरून चालवली जाईल. तसंच काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: megablock on mumbais all railway lines latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV