मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ

By: मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Wednesday, 1 March 2017 5:09 PM
मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ सुरु झाला आहे. प्रत्यक्षात निवडणूक 9 मार्च रोजी घेणं अपेक्षित आहे. मात्र, आयुक्तांनी अचानक सुचवलेल्या बदलांमुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधीच म्हणजे 8 मार्चला होण्याची शक्यता आहे.

भाजप 8 मार्चसाठी आग्रही आहे तर शिवसेनेकडून 9 तारखेला निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे.

खरंतर 8 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे 9 मार्चला नवा महापौर बसवणं अपेक्षित आहे. मात्र महापालिका आयुक्त एक दिवस आधीच म्हणजे 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याची शक्यता आहे.

महापौर पदाची निवडणूक 8 मार्चलाच घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या 8 मार्चला निवडणूक झाल्यास मोठा प्रशासकीय पेच निर्माण होईल.

2012 मध्ये निवडून आलेल्या जुन्या महापालिका सभागृह सदस्यांची मुदत ही 8 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत आहे. जर 8 मार्चलाच निवडणूक घेतली तर नव्या नगरसेवकांसह जुने नगरसेवकही मतदानाचे दावेदार ठरतील.

अशा परिस्थितीत 9 तारखेला निवडणूक झाल्यास मोठा पेच निर्माण होणार असल्याने प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न येता नियमाप्रमाणे 9 मार्चला महापौरपदाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

First Published: Wednesday, 1 March 2017 5:01 PM

Related Stories

मुंबईतील मालाडमध्ये गॅस पाईपलाईन लीक, वाहतूक विस्कळीत
मुंबईतील मालाडमध्ये गॅस पाईपलाईन लीक, वाहतूक विस्कळीत

मुंबई : मालाडमधील पुष्पा पार्कजवळ गॅस पाईपलाईन लीक झाल्याची घटना

खडसेंनी फडणवीस सरकारला झाप झाप झापलं!
खडसेंनी फडणवीस सरकारला झाप झाप झापलं!

मुंबई: भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस

पालिकेत वादळी चर्चा, नगरसेविका मात्र मोबाइल गेम खेळण्यात दंग!
पालिकेत वादळी चर्चा, नगरसेविका मात्र मोबाइल गेम खेळण्यात दंग!

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत अर्थसंकल्पावर

BMC Budget: मुंबई महापालिकेचा 12 हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर
BMC Budget: मुंबई महापालिकेचा 12 हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर

मुंबई: मुंबई महापालिकेचा 2017-18साठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.

BMC Budget : शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर
BMC Budget : शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर

मुंबई: मुंबई महापालिकेचा 2017-18 चा शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरुन हायकोर्टात मत-मतांतर
मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरुन हायकोर्टात मत-मतांतर

मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासप्रवर्ग आयोगाकडे पाठवायचा की

विद्यार्थी-पालकांना दिलासा, खासगी कॉलेजची फी 20 टक्क्यांनी कमी होणार!
विद्यार्थी-पालकांना दिलासा, खासगी कॉलेजची फी 20 टक्क्यांनी कमी...

मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा 10 हजार कोटीने कमी?
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा 10 हजार कोटीने कमी?

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई

मोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता
मोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या एनडीएच्या

जुहूतील चौकाला श्रद्धा कपूरच्या आजोबांचं नाव !
जुहूतील चौकाला श्रद्धा कपूरच्या आजोबांचं नाव !

मुंबई : जुहू स्कीम परिसरात गुलमोहर क्रॉस चौकाचं नामकरण ‘पंडित