येत्या तीन दिवसात दुधाचे दर वाढवणार : दुग्धविकास मंत्री

येत्या तीन दिवसात दुधाचे दर वाढवणार : दुग्धविकास मंत्री

उस्मानाबाद : राज्य सरकारने शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संपाला अखेर यश मिळालं आहे. येत्या 3 दिवसात दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

दुधाच्या नव्या दरांनुसार सध्याचा 24 रुपये लिटरनं असणारा गाईच्या दुधाचा दर आता 27 रुपयांपर्यंत वाढणार आहे. तर 33 रुपये लिटरनं म्हशीच्या दुधाचा असणारा दर आता 37 रुपयांपर्यंत वाढणार आहे.

येत्या तीन दिवसात दुधाचे नवे दर लागू होणार असून दूध संघांना हे नवे दर दूध उत्पादकांना देणं बंधनकारक असणार आहे.

“राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे. 13 तारखेला दुधाचे नवे दर घोषित करुन, शेतकऱ्यांना दिलासा देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार उभं राहील.”, असे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

“शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर वाढवले असले, तरी सामान्य लोकांचाही सरकार विचार करत आहे. मध्यमवर्गीयांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. मात्र, बळीराजाला आधार देण्याची आपण भूमिका घेतली पाहिजे.”, असेही जानकर यावेळी म्हणाले.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: milk rate दर दूध
First Published:
LiveTV