Minister Ramdas Athawale reaction on padmavati movie latest update

By: | Last Updated: 23 Nov 2017 06:14 PM
Minister Ramdas Athawale reaction on padmavati movie latest update

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं स्थान आहे. त्यामुळे तिचा जो डान्स दाखवला आहे. तो काढून टाकावा अशी आमची भूमिका आहे. पण तो सिनेमाच प्रदर्शित होऊ नये या मताचा मी नाही.’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजित न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून पद्मावती सिनेमाबाबत बराच वाद सुरु आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाला विरोध होत आहे. याच सिनेमाबाबत बोलत असताना रामदास आठवलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काही नेत्यांनी हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे. पण आठवलेंनी या सिनेमाला विरोध केलेला नसून फक्त त्यातील काही भाग वगळण्याची मागणी केली आहे.

‘हार्दिक पटेलनं भाजपला पाठिंबा द्यावा’

दरम्यान, रामदास आठवलेंनी गुजरात निवडणुकीवरही यावेळी भाष्य केलं. ‘मी गुजरातला गेल्यावर हार्दिक पटेलला सांगणार आहे की, पाटीदार समाजाला आरक्षण हवं असेल तर भाजपला पाठिंबा द्यावा लागेल. काँग्रेसला पाठिंबा देऊन आरक्षण मिळणार नाही. तसेच गुजरात मध्ये १२५ हून अधिक भाजपच्या जागा येतील. पण कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारीही वाढेल.’ असंही ते यावेळी म्हणाले.

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV