मंत्र्यांची मालमत्ता व देणी जाहीर करण्यास सरकार उदासीन

मंत्र्यांची मालमत्ता आणि देणी सरकारनं जाहीर करावीत अशी मागणी होत असतानाही भाजप सरकार याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

Ministers Assets & Liabilities not being disclosed by the Maharashtra Government latest update

मुंबई :आनसल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांसह 21 कॅबिनेट आणि 13 राज्यमंत्र्यांची माहिती सरकार दरबारी सादर झाल्याची यादी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना देण्यात आली आहे.

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळापासून आता भाजपा सरकारच्या कार्यकाळापर्यंत सतत मंत्र्यांची मालमत्ता व देणी याची माहिती सार्वजनिक करण्यासाठी अनिल गलगली पाठपुरावा करत आहे. अनिल गलगलींना उपलब्ध करुन दिलेल्या माहितीत सामान्य प्रशासन विभागाने 21 कॅबिनेट आणि 13 राज्यमंत्र्यांची यादी दिली आहे. पण त्यात अनेक मंत्र्यांची नावे नाहीत.

एकूण 23 कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत यांचे नाव यादीत नाही तर एकूण 16 राज्यमंत्र्यांपैकी संजय राठोड, दादाजी भुसे आणि रविंद्र वायकर यांचेही नाव यादीत नाही.

अनिल गलगली यांच्या मते, ज्या मंत्र्यांनी आपली मालमत्ता व देणी सादर केले होते. त्यांची नावे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वेबसाईटवर प्रसिध्द केली होती. पण नवीन सरकारने माहिती सार्वजनिक करणे तर दूर उलट नावेही प्रसिध्द करण्याचे हेतुपूर्वक टाळले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मंत्र्यांची मालमत्ता व देणी याची माहिती जनतेसाठी सार्वजनिक करतात. पण त्यांचे अनुकरण महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

14 नोव्हेंबर 2014 पासून अनिल गलगली यांच्या मागणीचा विचार करणे तर सोडाच साधे उत्तर ही देण्याचे सौजन्य प्रशासनानं दाखविले नाही. गलगली यांनी 14 नोव्हेंबर 2014 , दिनांक 9 मार्च 2015 आणि 29 जुलै 2016 अशी 3 पत्रे पाठवून केंद्र आणि बिहारच्या धर्तीवर राज्यातील सर्व मंत्र्यांच्या मालमत्तेची माहिती ऑनलाइन जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

 

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ministers Assets & Liabilities not being disclosed by the Maharashtra Government latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत
नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत

मुंबई : गरीब कुटुंबातील लहान मुलांना अवघ्या काही हजारात विकत घेऊन

शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे
शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे

डोंबिवली : शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा

सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना विनंती करणार
सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना...

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्या शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका
शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका

मुंबई: नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक

एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन
एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं

ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला सक्त ताकीद
ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला...

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या बाबतीत यंदा कोर्टालाच तारीख

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले

मुंबई : शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये आणि जरी शिवसेना बाहेर

55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास
55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

मुंबई : 55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाला

रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या
रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या

कल्याण : कल्याणजवळच्या बदलापूरमध्ये एक तरुण आणि तरुणीने

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची