अल्पवयीन मुलांना गाडी देणं जीवावर, चिमुरड्याचा अपघाती मृत्यू

अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मुलांसोबत त्यांच्या हाती गाडीची चावी देणारे पालकही या घटनेला तितकेच जबाबदार आहेत.

अल्पवयीन मुलांना गाडी देणं जीवावर, चिमुरड्याचा अपघाती मृत्यू

ठाणे : अल्पवयीन मुलांच्या हाती दिलेली गाडीची चावी त्यांच्याच जीववर बेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ठाण्यात भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर 15 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.

ठाण्यात भरधाव खाजगी बसची धडक दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. नितीन कंपनीजवळील चौकात एका खाजगी बसच्या चालकानं स्कूटीवरुन जाणाऱ्या दोन लहान मुलांना धडक दिली. 13 वर्षांच्या गुलाम कासमानीचा  जागीच मृत्यू झाला, तर 15 वर्षाचा हसन कासमानी मुलगा गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. या अपघातात नेमकी कोणाची चूक आहे, याचा अधिक तपास सुरु आहे. मात्र अपघातातील दोन्ही मुलांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मुलांसोबत त्यांच्या हाती गाडीची चावी देणारे पालकही या घटनेला तितकेच जबाबदार आहेत.

अशाप्रकारे आधीही ते दुचाकी घेऊन बाहेर जायचे. मात्र ते इतके लांब जातील याची कल्पना नसल्याचं पालकांनी सांगितलं. रोजप्रमाणे बाजारात जायचं म्हणून ते दुचाकी घेऊन गेले, मात्र पोलिसांचा फोन आल्यावर घरच्यांना त्यांच्या अपघातांची कल्पना आली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Minor boys died in accident, Parents to be blamed latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV