‘पद्मावती’ सिनेमाला आमदार राम कदमांचाही विरोध

‘विशिष्ट समाजाला दुखावणारे दृश्य चित्रपटातून न काढल्यास यापुढे भन्सालींच्या कोणत्याही सिनेमाचं शुटींग होऊ देणार नाही.’

‘पद्मावती’ सिनेमाला आमदार राम कदमांचाही विरोध

मुंबई : ‘पद्मावती’ चित्रपटामागचं शुक्लकाष्ट संपण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. कारण आता भाजप आमदार राम कदम यांनी देखील या सिनेमाविरोधात आवाज उठवला आहे. ‘विशिष्ट समाजाला दुखावणारे दृश्य चित्रपटातून न काढल्यास यापुढे भन्सालींच्या कोणत्याही सिनेमाचं शुटींग होऊ देणार नाही.’ असा त्यांनी इशारा दिला आहे.

फिल्म स्टुडियो अलाइड मजदूर युनियनच्या माध्यमातून याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी चित्रपटात बदल न केल्यास इथून पुढे त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग होऊ देणार नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आमदार राम कदम?

‘केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीनं इतिहासाशी खोडसाळपणा करणं आणि लोकांच्या भावना दुखावणं हे कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाला करता येणार नाही. जर संजय लीला भन्सालींनी पद्मावती चित्रपटातील लोकांच्या भावना दुखावणारे दृष्य बदलले नाहीत तर यापुढे आमची युनियन त्यांचा एकही चित्रपटचं शुटींग होऊ देणार नाही.’ असं राम कदम यावेळी म्हणाले.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MLA Ram Kadam oppose to Padmavati movie latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV