दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक

‘येत्या दहा दिवसात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील दुकानांच्या पाट्या मराठी झाल्या नाहीत, तर दुकानांपूर्वी कल्याण कामगार आयुक्तालय फोडू’, असा इशारा मनसेनं दिला आहे.

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक

कल्याण : फेरीवाल्यांपाठोपाठ मनसेनं पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दाही उचलून धरला आहे. त्यामुळे कल्याणमध्येही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

‘येत्या दहा दिवसात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील दुकानांच्या पाट्या मराठी झाल्या नाहीत, तर दुकानांपूर्वी कल्याण कामगार आयुक्तालय फोडू’, असा इशारा मनसेनं दिला आहे.

mns kalyan-

शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) कामगार आयुक्तांची भेट घेतली. दुकानांचे परवाने देताना सरकारी अधिकाऱ्यांनी नियमानुसार दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करावं. मात्र, या बाबी तपासल्या जात नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MNS again aggressive for Marathi name plate on shops latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV