कायदे पाळा, आम्ही शांत राहू, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा बीएमसीनं कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं.

कायदे पाळा, आम्ही शांत राहू, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई : फेरीवाल्यांप्रश्नी न्यायालयाचे निर्देश पाळा, तसं झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार नाही, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

फेरीवाल्यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी ही माहिती दिली. यापुढे फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा बीएमसीनं कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं.

मनसेबाबत ‘ते’ आरोप बिनबुडाचे : बाळा नांदगावकर


'हायकोर्टाने आधीच 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना मनाई केलेली आहे. आम्हाला लाठ्या-काठ्या घेऊन मुलं पाठवण्याची हौस नाही. पण अनधिकृत फेरीवाल्यांना किती काळ आम्ही सहन करायचं, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं' असं नांदगावकर म्हणाले.

एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MNS Chief Raj Thackeray suggests CM Devendra Fadanvis to obey court orders latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV