लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!

लक्ष्मीपूजनचा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून मोदी सरकारवर टीका केली आहे.

लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!

मुंबई : फेसबुक पेज सुरु केल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शब्दांनी नव्हे तर कुंचल्यांनी सरकारला फटकारणं सुरु केलं आहे. लक्ष्मीपूजनचा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून मोदी सरकारवर टीका केली आहे.

या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांकडे देश चालवण्यासाठी पैसे मागत असल्याचं रेखाटण्यात आलं आहे. हे व्यंगचित्र काढतानाचा राज ठाकरेंचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे पूजन करुन समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. लक्ष्मी प्रसन्न व्हावी, असा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मीच मोदी आणि शाहांकडे 'देश चालवायला मला थोडे पैसे देता का?,' अशी विचारणा करताना दिसत आहे.संबंधित बातम्या :

मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी पोस्टराज ठाकरे यांची पहिली फेसबुक पोस्ट


राज ठाकरेंची फेसबुकवर थेट ‘व्हेरिफाईड’ एण्ट्री

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV