मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी पोस्ट

दाऊद इब्राहिम मोदींना भारतात फरफटत आणत असल्याचं दिसत आहे. मात्र दाऊदला मी खेचून आणल्याचं मोदी इतरांना सांगत आहेत.

मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी पोस्ट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे फेसबुक पेज लाँच केल्यानंतर चांगलेच अॅक्टिव्ह झालेले दिसत आहेत. दुसऱ्याच पोस्टमध्ये राज यांनी व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. फेसबुक पेजच्या लाँचिंगवेळी मोदी आणि दाऊदबाबत केलेलं वक्तव्य राज ठाकरे यांनी कारटूनच्या माध्यमातून रेखाटलं आहे.

या व्यंगचित्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मोदींना भारतात फरफटत आणत असल्याचं दिसत आहे. मात्र दाऊदला मी खेचून आणल्याचं मोदी इतरांना सांगत आहेत. एक 'तर्क'चित्र असं लिहित हे कारटून राज ठाकरेंनी शनिवारी रात्री 11.20 वाजता आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलं आहे.


दाऊदला स्वतः भारतात यायचंय, मात्र मोदी श्रेय लाटणार : राज ठाकरे


एफबी पेजच्या लाँचिंगवेळी मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात केलेल्या भाषणात राज यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला होता. 'दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन मातृभूमीत अंतिम श्वास घ्यायचा आहे. त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे' असं राज ठाकरे म्हणाले होते. या आरोपांवरच आधारित हे रेखाचित्र आहे.

'भारतात येण्याची त्याची इच्छा आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण दाऊदला पकडून भारतात आणल्याचा डंका पिटणार' असं राज म्हणाले होते. बॉम्बस्फोटाला इतकी वर्ष झाली, इतक्या वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते आम्ही केलं, दाऊदला आमच्या पंतप्रधानांनी पकडून आणलं, असा दावा भाजप करणार आणि श्रेय लाटून आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी त्याचा फायदा करुन घेणार, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

संबंधित बातम्या :


राज ठाकरेंची फेसबुकवर थेट ‘व्हेरिफाईड’ एण्ट्री


राज ठाकरे यांची पहिली फेसबुक पोस्ट

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV