मनसेच्या मुंबईतील 6 नगरसेवकांचा सेनाप्रवेश अधिकृत : सूत्र

विभागीय आयुक्तांचा निकाल म्हणजे मनसेला धक्का मानला जात आहे.

मनसेच्या मुंबईतील 6 नगरसेवकांचा सेनाप्रवेश अधिकृत : सूत्र

मुंबई : नगरसेवक पक्षांतर प्रकरणी मनसेला मोठा धक्का मिळाला आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांना अधिकृत गटात समावेशासाठी विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांचा निकाल म्हणजे मनसेला धक्का मानला जात आहे.

मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक :

 1. अर्चना भालेराव (वॉर्ड क्र. 126)

 2. परमेश्वर कदम (वॉर्ड क्र. 133)

 3. अश्विनी मतेकर (वॉर्ड क्र. 156)

 4. दिलीप लांडे (वॉर्ड क्र. 163)

 5. हर्षल मोरे (वॉर्ड क्र. 189)

 6. दत्ताराम नरवणकर (वॉर्ड क्र. 197)


मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227

 • शिवसेना अपक्षांसह - 84 +  4 अपक्ष = 88

 • भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 83+अपक्ष 2= 85

 • कॉंग्रेस - 30

 • राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9

 • मनसे - 7 (यातील 6 नगरसेवक आता सेनेत दाखल होतील)

 • सपा - 6

 • एमआयएम - 2


दरम्यान, या सहा नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मनसेने याचिका केली आहे. त्यावर अद्याप निर्णय बाकी आहे. त्यामुळे त्या याचिकेवर काय निर्णय लागतो, हेही महत्त्वाचे आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MNS corporators entry in shivsena is legal
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV