मनसेकडून नगरसेवकांना व्हीप जारी, सभागृहात कोण- कुठे बसणार?

कोणत्याही बैठकीत मतदान करु नये. मतदान केल्यास पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत.

मनसेकडून नगरसेवकांना व्हीप जारी, सभागृहात कोण- कुठे बसणार?

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 6 नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे.  पक्षाकडून सूचना मिळाल्याशिवाय महापालिका सभागृह किंवा कोणत्याही बैठकीत मतदान करु नये. मतदान केल्यास पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत.

दरम्यान, मनसेतून शिवसेनेत गेलेले 6 नगरसेवक नेमके कुणाकडे आहेत, याचं नेमकं उत्तर आज मिळणार आहे. कारण, आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात बैठक होत आहे. यात हे सहाही नगरसेवक नेमके कुणाच्या बाजूनं बसतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

शिवसेनेत गेलेले नगरसेवक पुन्हा मनसेत येणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. मात्र हा दावा शिवसेनेने खोडून काढला. तसंच शिवसेनेत आलेले मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी स्वत: पत्रक काढून आम्ही शिवसेनेत असल्याचं सांगितलं.

या सर्व पार्श्वभूमीवर मनसेने नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे.

दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.

शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती.

संबंधित बातम्या

शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे 

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MNS issues whip to its BMC Corporators
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV