मनसेनं संजय निरुपमांची सभा उधळली, कार्यकर्ते भिडले

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेनं उधळून लावली आहे.

मनसेनं संजय निरुपमांची सभा उधळली, कार्यकर्ते भिडले

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेनं उधळून लावली आहे. घाटकोपरच्या संजय गांधी नगर परिसरात नालाबाधीत झोपडपट्टीवासियांसाठी निरुपम यांची पूर्वनियोजित सभा होती. याचवेळी सभेत घुसून मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सभेच्या ठिकाणी निरुपम यांचं आगमन झाल्याबरोबर काही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्याचबरोबर खुर्च्याही उचलून फेकल्या. तसेच  काही मनसैनिक थेट स्टेजवरच गेले. त्यामुळे त्यांच्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

यावेळी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, यापुढे निरुपम याची प्रत्येक सभा उधळणार असल्याचंही मनसे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा वाद सुरु आहे. याच वादातून मालाडमधील काही फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या फेरीवाल्यांना निरुपम यांनी भडकवल्याचा आरोप मनसेनं केला होता. याच मारहाणीच्या निषेधार्थ निरुपम यांची सभा उधळल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MNS mess up during Sanjay Nirupam’s rally latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV