मुंबई महापालिका शाळांमधील 'वंदे मातरम्' सक्तीला मनसेचा विरोध

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये 'वंदे मातरम्' सक्तीच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि सपानंतर मनसेनं देखील विरोध केला आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांची दुरवस्था, रोडावणारी पटसंख्या, टॅब आणि शिक्षण साहित्य घोटाळा या सगळ्यांवर लक्ष देण्याऐवजी वंदे मातरमची सक्ती का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय.

By: | Last Updated: > Friday, 11 August 2017 6:41 PM
mns oppose on to sing vande mataram in bmc schools

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि सपानंतर मनसेनं देखील विरोध केला  आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांची दुरवस्था, रोडावणारी पटसंख्या, टॅब आणि शिक्षण साहित्य घोटाळा या सगळ्यांवर लक्ष देण्याऐवजी वंदे मातरमची सक्ती का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय.

मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये आठवड्यातून किमान दोनदा ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा प्रस्ताव काल महासभेत मंजूर केला. ज्याला एमआयएम आणि सपानं जोरदार विरोध केलाय. यानंतर मनसेनं देखील ‘वंदे मातरम्’ सक्तीच्या प्रस्तावावरून शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र डागलंय.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ म्हणायला कुणाचाच विरोध नाही. पण ज्या गितानं स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रभक्तीची चेतना सर्व भारतीयांमध्ये निर्माण केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे गीत आजरामर झालं. त्या गीताचा वापर सत्ताधारी स्वत: च्या स्वार्थासाठी करत असतील, तर यातून ते स्वत:चं अपयश लपवत आहेत. कारण सत्ताधारी शाळेचा दर्जा सुधारु शकले नाहीत, त्यावरुन लक्ष्य विचलित करण्यासाठी ‘वंदे मातरम्’ चा वापर होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.”

दुसरीकडे महापालिकेच्या प्रस्तावाला समाजवादी पक्षानेही कडाडून विरोध केला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी याला विरोध करताना शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे.

‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच ‘वंदे मातरम्’ गाणार नाही. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका’ असं अबू आझमी म्हणाले होते.

काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली. त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसले.

व्हिडीओ पाहा

 

संबंधित बातम्या

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ अनिवार्य

शाळा-कॉलेजमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सक्तीचं : मद्रास हायकोर्ट

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:mns oppose on to sing vande mataram in bmc schools
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान
मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रॅकशेजारी मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय

कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर
कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर

मुंबई : सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन

भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर
भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर

मुंबई : शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/08/2017   शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका!

कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी शिक्षणाचा स्वप्नभंग
कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी...

मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता

वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता
वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी...

नवी मुंबई : नवी मुंबईमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ

कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर चव्हाणांचं उत्तर
कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर...

मुंबई : “काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.

कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   
कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   

डोंबिवली : डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेची हत्या

मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई
मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई

घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास
घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास

मुंबई: घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डरला सहा