मनसेचं अनोखं आंदोलन, कोरड्या स्विमिंग पूलमध्ये स्पर्धेचं आयोजन

मनसेचं अनोखं आंदोलन, कोरड्या स्विमिंग पूलमध्ये स्पर्धेचं आयोजन

डोंबिवली : ऐन उन्हाळी सुट्टीच्या काळात डोंबिवलीतील पालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलातलं स्विमिंग पूल डागडुजीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे शहरातील खाजगी स्विमिंग पूल मात्र हीच संधी साधत विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत असून यामुळे सर्वसामान्य पालक नाहक भरडले जात आहेत. याविरोधात बुधवारी मनसेनं डोंबिवलीत कोरड्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग स्पर्धा घेतली.

डोंबिवलीच्या घारडा सर्कल इथं पालिकेच्या वतीनं सावळाराम क्रीडा संकुल उभारण्यात आलं असून यात ऑलिम्पिक दर्जाच्या स्विमिंग पूलचाही समावेश आहे. मात्र हे स्विमिंग पूल मागील काही वर्षांपासून सातत्यानं नेमक्या सुट्टीच्या काळातच बंद ठेवलं जात असल्याचा मनसेचा आरोप आहे.

याविरोधात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम आणि शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, पालक आणि मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी स्विमिंग पूलवर धडक दिली. यावेळी महापौर आणि आयुक्तांच्या नावाने मनसे कार्यकर्त्यांप्रमाणेच लहान मुलांनीही तुफान घोषणाबाजी केली.

यानंतर स्विमिंग पूलमध्ये कोरड्या पडलेल्या एका पूलमध्ये लहान मुलांची पोहण्याची स्पर्धा घेऊन त्याच्या विजेत्याला महापौर चषक देण्यात आला. येत्या चार दिवसांत जर हे स्विमिंग पूल सुरू झालं नाही, तर पुढचं आंदोलन महापौर आणि आयुक्तांच्या दालनात होईल, असं इशारा यावेळी देण्यात आला.

तर स्विमिंग पूलच्या मोटर्स बिघडल्यामुळे पूल बंद असल्याचं कारण पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी दिलंय. येत्या चार दिवसांत पाणी भरण्याचं काम पूर्ण करून स्विमिंग पूल चालू करू, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

First Published:

Related Stories

जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर आणखी एक गुन्हा!
जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर आणखी एक गुन्हा!

मुंबई : मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तुरुंगात

हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब
हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब

मुंबई : हरियाणाची मनुषी छिल्लर 2017 ची ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली आहे.

लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI
लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI

मुंबई : तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला

येत्या 24 तासात मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
येत्या 24 तासात मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान

देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी
देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी

मुंबई : आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात

मुंबई उपनगरांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग
मुंबई उपनगरांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

पालघर : गेल्या 24 तासात पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह चांगलाच

पावसाळी वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी दादरमध्ये भजी महोत्सवाचं आयोजन
पावसाळी वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी दादरमध्ये भजी महोत्सवाचं...

मुंबई : सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन

मुंबई : रविवारी वरुणराजा मुंबईकरांवर मेहेरबान झाला असून, मोठ्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ‘हाईट बॅरिअर्स’ दोन दिवसात तुटले!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ‘हाईट बॅरिअर्स’ दोन दिवसात तुटले!

रायगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा

मुंबई : राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली असली, तरी शेतकरी