मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रुझमधील फेरीवाले हटवले

मनसेने कारवाई केलेला वॉर्ड मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आहे.

मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रुझमधील फेरीवाले हटवले

मुंबई : मनसेची मुंबईतील स्थानकांबाहेरच्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाई सुरुच आहे. सांताक्रुझ पूर्वला असलेल्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक होत मनसेने जोरदार राडा केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत फेरीवाल्यांना हटवलं. पुन्हा या जागी व्यवसाय न करण्याची सक्त ताकीद मनसेने फेरीवाल्यांना दिली आहे.

विशेष म्हणजे मनसेने कारवाई केलेला वॉर्ड मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आहे. त्यांच्या आशिर्वादानेच फेरीवाले इथे असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

प्रशासनाला अल्टीमेटम देऊन कळत नसेल तर याच पद्धतीने फेरीवाले हटवले जातील, असा इशाराही मनसेने दिला. मनसेने यापूर्वी विविध स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांना हटवलं आहे.

दरम्यान मनसेकडून केवळ उत्तर भारतीयांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र फेरीवाल्यांमध्ये 80 टक्के उत्तर भारतीयच असतील, तर मनसे काय करणार, असं प्रत्युत्तर मनसेने दिलं आहे.

रामदास आठवलेंना उत्तर

मनसे कार्यकर्त्यांना कोणाला मारायचंच असेल, तर त्यांनी सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना मारावं, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला. मुंबई-ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली. मात्र सीमेवर जाऊन कसं लढायचं हे आम्हाला रामदास आठवलेंनी शिकवू नये, एवढं असेल तर सत्तेत आहात, पुढे या आणि फेरीवाले हटवा, अशा शब्दात मनसेने उत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या :

मारायचंच असेल तर मनसेने सीमेवर पाक सैनिकांना मारावं : आठवले


राज ठाकरेंकडून परप्रांतियांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप


फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे


ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड


PHOTO : ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: hawkers MNS फेरीवाले मनसे
First Published:

Related Stories

LiveTV