फेरीवाल्यांविरोधात मनसेचा दादरमध्ये मोर्चा

आंदोलकांनी फेरीवाले, रेल्वे आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.

फेरीवाल्यांविरोधात मनसेचा दादरमध्ये मोर्चा

मुंबई : राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतरही मुंबईतल्या अनेक स्टेशन बाहेर फेरीवाले कायम आहेत. त्याविरोधात आज मनसेनं मोर्चाचं आयोजन केलं होतं.

दादर परिसरात या मोर्चाला सुरुवात झाली. दादर सुविधा शॉपिंग सेंटर ते केशवसूत उड्डाणपुलाभोवती फ्लॅग मार्च काढण्यात आला.

आंदोलकांनी फेरीवाले, रेल्वे आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात  घेतलं.

दरम्यान, एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मनसेनं रेल्वे प्रशासनाविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळी फेरीवाल्यांना हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदतही रेल्वे प्रशासनाला देण्यात आली होती.

ही डेडलाइन संपल्यानंतर मनसेनं ठाणे, कल्याण, डोंबिवली स्टेशनबाहेर फेरीवाल्यांविरोधात मनसे स्टाइल आंदोलन केलं होतं. त्यावेळी अनेक फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

फेरीवाला आंदोलन : कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या बड्या नेत्यांना अटक

फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे

ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड

मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रुझमधील फेरीवाले हटवले

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mns protest march against hawkers latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV