मनसेचं पालिकेच्या रुग्णालयाविरोधात अनोखं आंदोलन

गेली अनेक वर्ष मुलुंड मधील पालिकेचे मोठे रुग्णालय असलेल्या एमटी अग्रवाल रुग्णालयाची प्रचंड दुरावस्था झालेली असताना याकडे पालिका प्रशासना दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

मनसेचं पालिकेच्या रुग्णालयाविरोधात अनोखं आंदोलन

मुंबई : मुलुंड येथे मनसेने पालिकेच्या एमटी रुग्णालयाविरोधात आज अनोख आंदोलन केलं. रुग्णालयाची दुरावस्था मांडण्यासाठी सलाईन लावलेली प्रतिकृती तयार करुन शहरात फिरवली. यावेळी स्ट्रेचरवर ठेवलेली प्रतिकृती घेऊन मनसैनिकांनी रुग्णालयात घुसण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यांना वेळीच पोलिसांनी रोखले.

गेली अनेक वर्ष मुलुंड मधील पालिकेचे मोठे रुग्णालय असलेल्या एमटी अग्रवाल रुग्णालयाची प्रचंड दुरावस्था झालेली असताना याकडे पालिका प्रशासना दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

दरम्यान  मनसेच्या शिष्ट मंडळाने रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि पंधरा दिवसात रुग्णालयाच्या दुरावस्थेवर उपाय करावे अथवा मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MNS unique protest against Municipal Corporation’s hospital
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV