नालासोपाऱ्यात भोंदूबाबाकडून महिलेचा विनयभंग

नालासोपाऱ्यात एका भोंदूबाबाने अंगातून भूतबाधा काढण्याच्या नावाखाली एका महिलेशी अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे.

नालासोपाऱ्यात भोंदूबाबाकडून महिलेचा विनयभंग

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका भोंदूबाबाने अंगातून भूतबाधा काढण्याच्या नावाखाली एका महिलेशी अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला तिच्या मुलाच्या अंगातील भूतबाधा काढण्यासाठी भोंदूबाबाकडे आली होती. पण बाबाने मुलाचे भूत काढायचे असेल तर पहिल्यांदा तुझ्या अंगातील भूत काढावे लागेल असं सांगून महिलेशी अश्लील वर्तन केलं. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोंदूबाबाला पोलिसांनी अटकही केली आहे.

रमेश झेबिराज यादव उर्फ अवगडबाबा असे या भोंदूबाबाचं नाव आहे. नालासोपाऱ्यातील संतोषभुवन भावशेतपाडा परिसरात त्याने आपले दुकान थाटले होते. याच परिसरात त्याने एक ऐसपैस जागा पकडून तबेलाही उभारला आहे. तबेल्यातच एक त्याची रुम असून त्या रुममध्ये तो महिला-पुरुषांचे भूतबाधा उतरविण्याचे काम करीत असे. त्याच्या या रुममधून पोलिसांना गंडादोरा, तीन बाटल्या, नारळ अशा वस्तूही सापडल्या आहेत.

नेमकी घटना काय?

पीडित महिलेचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून घरात सारखी तोडफोड करीत होता. यामुळे त्याला भूतबाधा झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना आला. ही बाधा दूर करण्यासाठी पीडित महिला तिची बहिण आणि इतर नातेवाईकांना घेऊन 5 डिसेंबर रोजी अवगडबाबाकडे आली होती. यावेळी या बाबानं महिलेच्या अंगातील भूत काढावं लागेल असं सांगत तिला तबेल्याच्या  बाजूला नेऊन तिच्यासोबत अश्लील वर्तन करु लागला. त्याचवेळी महिलेला चाकू दाखवून घाबरवण्याचा प्रयत्नही त्यांने केला.

दरम्यान,घाबरलेल्या महिलेनं तिथून तात्काळ पळ काढला. आणि तुळींज पोलिस ठाण्यात आवगडबाबा विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तात्काळ त्या भोंदूबाबच्या मुसक्या आवळल्या. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन विनयभंग, धमकी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Molestation of woman by Bhondu baba in Nalasopara latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV