ठाण्यात इमारतीच्या गच्चीवर माकड फास लागलेल्या अवस्थेत

या माकडला फास देऊन मारण्यात आल्याचा आरोप इमारतीमधीलल एका रहिवाशाने केला आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर माकडाच्या मृत्यूबाबत सत्यता समोर येईल असं वनविभागानं म्हटलं आहे.

ठाण्यात इमारतीच्या गच्चीवर माकड फास लागलेल्या अवस्थेत

ठाणे : ठाण्याच्या लोकमान्य नगरमधील एका इमारतीच्या गच्चीवर माकड मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. सिद्धिविनायक पार्कमधील इमारत क्रमांक ३च्या गच्चीवर हे माकड दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळलं.

या माकडला फास देऊन मारण्यात आल्याचा आरोप इमारतीमधीलल एका रहिवाशाने केला आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर माकडाच्या मृत्यूबाबत सत्यता समोर येईल असं वनविभागानं म्हटलं आहे. लोकमान्यनगर परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. माकडलीलांमुळे येथील नागरिक त्रस्त असतात. याच कारणातून या माकडाला मारलं असावं असं बोललं जातं आहे.

या माकडाला फास देऊन मारण्यात आले की  त्याचा त्याठिकाणी खेळता-खेळता नैसर्गिक मृत्यू झाला. याबाबत वनविभाग सध्या तपास करत आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतरच माकडाच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. असं वनविभागानं स्पष्ट केलं.

VIDEO : 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Monkey found dead in Thane lokmanya nagar buildings terrace latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV