बॅग बाईकमध्ये अडकून आई फरपटत, चिमुरडी रिक्षाखाली

आशा यांची बॅग बाईकमध्ये अडकून त्यांचा तोल गेला. तर त्यांच्या कडेवर असलेली इस्थर डोळ्यादेखतच रिक्षाखाली आली.

बॅग बाईकमध्ये अडकून आई फरपटत, चिमुरडी रिक्षाखाली

मुंबई : चिमुरडीसह रस्त्यावरुन चालताना महिलेची बॅग बाईकमध्ये अडकल्यामुळे महिला फरपटत गेली, तर चिमुरडी रिक्षाखाली आल्यामुळे गंभीर जखमी झाली. डोंबिवलीमध्ये दोन आठवड्यांपूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला होता.

डोंबिवलीला राहणाऱ्या 35 वर्षीय आशा मॅथ्यू दहा महिन्यांच्या लेकीसोबत माहेरी निघाल्या होत्या. आशा यांच्या खांद्यावरील बॅगेचा पट्टा शेजारुन जाणाऱ्या बाईकमध्ये अडकला आणि त्यांचा तोल गेला. आशा काही मीटरपर्यंत फरपटत गेल्या, तर त्यांच्या कडेवर असलेली इस्थर डोळ्यादेखतच रिक्षाखाली आली.

बाईकचालक आणि पादचाऱ्यांनी तात्काळ मायलेकीला रुग्णालयात दाखल केलं. इस्थरचा फुल बॉडी सीटी स्कॅन केल्यावर तिच्या छातीत हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याची शक्यता वर्तवली गेली. त्यानंतर चिमुरडीला कुटुंबीयांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हलवलं.

इस्थरला पेडिअॅट्रिक आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी पेनकिलर्स दिल्या. सुदैवाने दोन आठवड्यांनंतर इस्थरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mother daughter met with accident in Dombivali latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV