12 वर्षांच्या मुलीची प्रेग्नन्सी, 24 वर्षीय आरोपीला बेड्या

पीडिता आणि आरोपी कांदिवलीत एकाच परिसरात राहतात. आरोपी पीडितेच्या वडिलांच्या फास्ट फूड स्टॉलवर मदतनीस आहे.

By: | Last Updated: > Saturday, 12 August 2017 10:05 PM
Mumbai : 12-year-old Pregnant student was raped by father’s helper latest update

मुंबई : मुंबईत 13 वर्षांची विद्यार्थिनी 27 आठवड्यांची गरोदर असल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पीडितेच्या वडिलांच्या फास्ट फूड स्टॉलवर काम करणाऱ्या 24 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ‘मि़ड डे’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पीडिता आणि आरोपी कांदिवलीत एकाच परिसरात राहतात. आरोपी पीडितेच्या वडिलांच्या फास्ट फूड स्टॉलवर मदतनीस आहे. आरोपी काही वेळा पीडितेच्या घरी जेवायला जायचा, तर काही वेळा त्यांच्याच घरी राहायचा. भविष्यात लग्न करण्याच्या आमिषाने 24 वर्षीय आरोपीने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.

पीडितेच्या पालकांच्यात तक्रारीनंतर चारकोप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुरुवारी अटक केल्यानंतर शुक्रवारी दिंडोशी कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

13 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची प्रेग्नंट, गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात

मुलीचं वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पीडितेचे आई-बाबा तिला चेकअपसाठी दवाखान्यात घेऊन गेले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पालकांनी मुलीला तपासणीसाठी दवाखान्यात नेलं. थायरॉईडमुळे लेकीचं वजन वाढत असल्याचं संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी 27 आठवड्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं.

पीडित मुलगी ही 27 आठवडयांची प्रेग्नंट असल्यानं गर्भपात केल्यास तिच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. मुलीच्या गर्भपातासाठी तिचे पालक डॉक्टरांच्या मदतीने सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : 12-year-old Pregnant student was raped by father’s helper latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LIVE : मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
LIVE : मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

मीरा-भाईंदर महापालिकेच्या 94 जागांसाठी आज सकाळी 7.30 वाजेपासून

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/08/2017 1.    नारायण राणेंच्या

LIVE : मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
LIVE : मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेसाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला

घर दुरुस्तीच्या परवानगीसाठी पार्किंगची जागा दाखवा : नवी मुंबई मनपा
घर दुरुस्तीच्या परवानगीसाठी पार्किंगची जागा दाखवा : नवी मुंबई मनपा

नवी मुंबई : नवी मुंबईमधील मोडकळीस आलेले धोकादायक स्थितीत असलेल्या

अंबरनाथ : कर्जत-कल्याणदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत
अंबरनाथ : कर्जत-कल्याणदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलचे पेंटाग्राफ तुटल्यामुळे

मुंबईतील शिवसेना नगरसेविकेसह पतीवर गुन्हा, बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप
मुंबईतील शिवसेना नगरसेविकेसह पतीवर गुन्हा, बंदुकीचा धाक...

मुंबई : शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांच्यासह पती विपुल दोशी

मुंबई लोकल : मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द
मुंबई लोकल : मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द

मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेने ठाकुर्ली येथील उड्डानपुलाचा गर्डर

राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!
राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे हे 27 ऑगस्टला भाजपात प्रवेश करणार

सह्याद्री अतिथीगृहाचा वापर पाककृती स्पर्धेसाठी?
सह्याद्री अतिथीगृहाचा वापर पाककृती स्पर्धेसाठी?

मुंबई : राज्याच्या शासकीय इमारतींपैकी सह्याद्री राज्य

महाराष्ट्राचे 'प्रशांत किशोर' अर्थात आशिष कुलकर्णींचा काँग्रेसला रामराम
महाराष्ट्राचे 'प्रशांत किशोर' अर्थात आशिष कुलकर्णींचा काँग्रेसला...

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रशांत किशोर म्हणून ओळख