पवईतील 400 फूट खाणीत तरुणी बुडाल्याची शक्यता

ही तरुणी काल रात्री एकच्या सुमारास या खाणीजवळ शौचास गेली होती. पण त्यानंतर इथे तिची चप्पल आणि ओढणीच आढळली.

पवईतील 400 फूट खाणीत तरुणी बुडाल्याची शक्यता

मुंबई : मुंबईतील पवईच्या रामबाग विभागात असलेल्या चारशे फूट खाणीत एक तरुणी बुडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिजा खान असं 17 वर्षीय तरुणीचं नाव आहे.

ही तरुणी काल रात्री एकच्या सुमारास या खाणीजवळ शौचास गेली होती. पण त्यानंतर इथे तिची चप्पल आणि ओढणीच आढळली. स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिल्यानंतर या तरुणीचा शोध सुरु आहे.

गेल्या काही वर्षात ह्या खदानीत आत्महत्या करुन किंवा पडून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यात मुखतः उघड्यावर शौचास गेल्याने अपघात होऊन अनेक जीव गेले आहेत. याबाबत शासनाने उपाय योजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : 17 years old girl may have died due to drowning in mine hole in Powai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV