मुंबईत 29 वर्षीय अभिनेत्री अंजली श्रीवास्तवचा गळफास

By: | Last Updated: > Monday, 19 June 2017 11:46 PM
मुंबईत 29 वर्षीय अभिनेत्री अंजली श्रीवास्तवचा गळफास

मुंबई : अंजली श्रीवास्तव नावाच्या नवोदित अभिनेत्रीने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. 29 वर्षीय अंजलीने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

अंजलीचे नातेवाईक तिला वारंवार फोन करत होते, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी घरमालकाशी फोनवरुन संपर्क साधला. घरमालकाने डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला असता अंजली साडीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

घरमालकाने तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अंजली अंधेरीतील जुहू परिसरातल्या परिमल सोसायटीत राहत होती.

घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. मात्र अंजलीने आत्महत्या कधी आणि का केली, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

गेल्याच आठवड्यात मॉडेल-अभिनेत्री कृतिका चौधरीच्या हत्येची घटना समोर आली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात आलेल्या आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूच्या वृत्तामुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.

First Published:

Related Stories

'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?
'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमाला म्हणावा

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस
ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

मुंबई : दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता

एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड
एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या भन्नाट यशानंतर आता सलमान खानच्या

रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा

नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज
कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज

मुंबई : पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव करुन चॅम्पियन्स

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे

'इंदु सरकार'वर ज्योतिरादित्य शिंदेंचा आक्षेप, दिग्दर्शक मधुर भांडारकरचं उत्तर
'इंदु सरकार'वर ज्योतिरादित्य शिंदेंचा आक्षेप, दिग्दर्शक मधुर...

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील ‘इंदु

अक्षय कुमार बनणार ‘पंतप्रधान’?
अक्षय कुमार बनणार ‘पंतप्रधान’?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ लवकरच

उसके साथ जीने का एक मौका दे दे.. अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी ट्विस्ट
उसके साथ जीने का एक मौका दे दे.. अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी...

मुंबई : नवोदित भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवच्या आत्महत्या