मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास महागणार, 12 रुपयांपर्यंत तिकीट दरवाढ

तिकीट आणि पासातील दरवाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी लागू होईल.

मुंबईकरांचा 'बेस्ट' प्रवास महागणार, 12 रुपयांपर्यंत तिकीट दरवाढ

मुंबई : आर्थिक गर्तेत असलेल्या 'बेस्ट'ला तारण्यासाठी प्रवाशांच्याच खिशाला हात घालण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनानं बस तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा बस प्रवास येत्या काळात महागण्याची चिन्हं आहेत.

बसभाडं आणि पास दरवाढीला काल बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्ट तिकिटावर एक ते 12 रुपये आणि मासिक पासासाठी 40 ते 350 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तिकीट आणि पासातील दरवाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी लागू होईल.

मुंबई पालिकेच्या अंतिम मंजुरीनंतरच बेस्ट भाडेवाढ लागू होईल, असं बेस्ट समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र तू्र्तास तरी तिकीट दरवाढीची टांगती तलवार मुंबईकरांच्या डोक्यावर आहे.

सहा किमीसाठी सध्या भाडे - 14 रुपये , प्रस्तावित दर - 15 रुपये

आठ किमीसाठी सध्या भाडे - 16 रुपये, प्रस्तावित दर - 18 रुपये

दहा किमीसाठी सध्या भाडे - 16 रुपये, प्रस्तावित दर - 22 रुपये

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : BEST Bus ticket rates to increase latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV