भाऊबीजेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप

बेस्टचे 32 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे बेस्टच्या 3800 बसपैकी एकही बस रस्त्यावर धावणार नाही.

भाऊबीजेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप

मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवसात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बोनस जाहीर न झाल्यामुळे भाऊबीजेला म्हणजेच शनिवारी 21 ऑक्टोबरला बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.

रक्षाबंधनप्रमाणचे भाऊबीजेलाही  बेस्ट बसेस रस्त्यावर धावणार नाहीत. त्यामुळे सणासुदीला बहिण-भावांकडे जाताना मुंबईकरांचे हाल होण्याची चिन्हं आहेत.

21 ऑक्टोबरला बेस्टच्या बसेस संपूर्णत: बंद राहणार आहेत. बेस्टचे 32 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे बेस्टच्या 3800 बसपैकी एकही बस रस्त्यावर धावणार नाही. 30 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. बोनस जाहीर न झाल्यास 18 तारखेपासून 21 पर्यंत ऐन दिवाळीतच बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते उपोषणाला बसणार आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV