महिलेवर झाड कोसळलं, त्यात मनपाचा दोष नाही: बीएमसीचा दावा

नारळाचे पडलेले झाड केवळ जोरदार हवेमुळे पडले, यात महापालिकेचा कोणताही दोष नाही असं या अहवालात म्हटलं आहे.

Mumbai : BMC report On chembur tree fallen

मुंबई: चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून महिलेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं अहवाल सादर केला आहे.

नारळाचे पडलेले झाड केवळ जोरदार हवेमुळे पडले, यात महापालिकेचा कोणताही दोष नाही असं या अहवालात म्हटलं आहे.

यापूर्वी पालिकेच्या एम पश्चिम विभागानं सादर केलेल्या अहवालातही हेच सांगण्यात आले होते.

यावरुन महापालिकेने हात वर केल्याचं स्पष्ट होत आहे.

20 जुलैला चेंबूरमधील स्वस्तीक पार्क परिसरात कांचन नाथ या मार्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळ त्यांच्या अंगावर नारळाचं झाड पडलं. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

महत्वाचं म्हणजे हे झाड धोकादायक असल्यानं नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या.

पण आता महापालिकेनं या घटनेतून स्वतःला बाजूला करत, हा नैसर्गिक अपघात दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे.

स्थानिकांच्या दाव्यानुसार या झाडाला कीड लागलेली होती. त्यामुळे झाड कोसळण्याची शक्यता असल्यानं लोकांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागात तक्रारीही दिल्या होत्या.

संबंधित बातमी

VIDEO : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर नारळाचं झाड कोसळलं

VIDEO:

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : BMC report On chembur tree fallen
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!
सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!

मुंबई : मुंबईतल्या लोअर परळ भागात असलेल्या पंजाब ग्रील या

गाडी टोईंग करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना, नवी नियमावली जारी
गाडी टोईंग करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना, नवी नियमावली जारी

मुंबई : मालाडमध्ये झालेल्या टोईंगच्या वादानंतर वाहतूक विभागाचे

ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त
ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त

  ठाणे : ठाण्यातल्या दिवा परिसरात खर्डी जंक्शनमध्ये मोठ्या

संजय निरुपमांना सुप्रीम कोर्टाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका फेटाळली
संजय निरुपमांना सुप्रीम कोर्टाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका...

नवी दिल्ली : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी

ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण
ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण

ठाणे : ठाण्याच्या मनसेनं ‘खळ्ळ खटॅक’ केलं आहे. कोलबाड परिसरात

भिवंडीत इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत
भिवंडीत इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत

भिवंडी (मुंबई) : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा तिघांवर

भटक्या कुत्र्याचे पंजे कापले, मीरा-भाईंदरमधील अमानवी कृत्य
भटक्या कुत्र्याचे पंजे कापले, मीरा-भाईंदरमधील अमानवी कृत्य

  मीरा-भाईंदर : भटक्या कुत्र्यांचं लिंग आणि पंजे कापून टाकण्याचा

मनसे-रिपाइंच्या सभा मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत : आठवले
मनसे-रिपाइंच्या सभा मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत : आठवले

मुंबई : ‘मनसे आणि रिपाइं या दोन्ही पक्षांच्या सभा मोठ्या होतात,

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?
उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत