CCTV : 10.19 वा. शितप गाडीतून निघाला, 10.24 वा. इमारत कोसळली

सीसीटीव्ही फुटेजनुसार 10 वाजून 19 मिनिटांनी शितप आपल्या गाडीत बसून निघाला आणि 10 वाजून 25 मिनिटांनी इमारत कोसळली.

Mumbai : CCTV footage of Ghatkopar building collapse

मुंबई : घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या फूटेजमध्ये 17 जणांचा जीव घेणारा सुनील शितप अक्षरश: थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.

इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीच सुनील शितप इमारतीच्या बाहेर पडला होता. शितप गाडीत बसून निघाला आणि पुढील काही क्षणांत संपूर्ण साईदर्शन इमारत कोसळली.

सीसीटीव्ही फुटेजनुसार 10 वाजून 19 मिनिटांनी शितप आपल्या गाडीत बसून निघाला आणि 10 वाजून 24 मिनिटांनी इमारत कोसळली.

घाटकोपरच्या दामोदर पार्क इथली 30 वर्ष जुनी साईदर्शन इमारत 25 जुलै रोजी कोसळली. यात 17 जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.

या इमारतीच्या तळमजल्यावर सुनील शितपचं नर्सिंग होम होतं. तिथे नुतनीकरणाचं काम सुरु होतं. परंतु रुग्णालयाचं नुतीनकरण करताना इमारतीच्या मूळ रचनेलाच धक्का लावण्यात आला होता. यावेळी पिलर तोडून लोखंडी रॉडने आधार दिला होता. तसंच इमारतीच्या कॉलमलाही धक्का लावल्याने इमारत कोसळल्याचा आरोप रहिवाशांचा आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सुनील शितपला अटक केली आहे. आरोपी सुनील शितपने इमारतीचे पिलर हटवल्यामुळे 17 जणांचे जीव गेले. त्यामुळे सुनील शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा), 336, 338, 283/17 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

संबंधित बातम्या :

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांची मदत

घाटकोपरमध्येच सुनिल शितपची आणखी 4 अनधिकृत बांधकामं

पेपरवाला ते कोट्यधीश, सुनिल शितपचा ‘सिनेमॅटिक’ प्रवास

घाटकोपर इमारत दुर्घटना: शितपनं पिलरच हटवले, रहिवाशांचा आरोप

मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली

इमारत दुर्घटना : पत्नी आयसीयूत, चिमुरडी गमावली, आईचा पत्ता नाही

घाटकोपर इमारत दुर्घटना : शिवसेनेच्या सुनील शितपला अटक

ढिगाऱ्याखाली 15 तास मृत्यूशी झुंज, राजेश दोशी सुखरुप

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : CCTV footage of Ghatkopar building collapse
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान
मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रॅकशेजारी मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय

कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर
कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर

मुंबई : सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन

भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर
भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर

मुंबई : शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/08/2017   शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका!

कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी शिक्षणाचा स्वप्नभंग
कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी...

मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता

वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता
वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी...

नवी मुंबई : नवी मुंबईमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ

कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर चव्हाणांचं उत्तर
कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर...

मुंबई : “काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.

कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   
कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   

डोंबिवली : डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेची हत्या

मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई
मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई

घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास
घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास

मुंबई: घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डरला सहा