नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य-हार्बर रेल्वेचा खोळंबा

थर्टी फर्स्ट साजरा करुन घरी परतणाऱ्या किंवा ऑफिसला जाणाऱ्या काही प्रवाशांच्या दिवसाची सुरुवातच त्रासाने झाली आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य-हार्बर रेल्वेचा खोळंबा

मुंबई : मुंबईकरांच्या नवीन वर्षाची सुरुवातच लोकल रेल्वेच्या खोळंब्याने झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे, तर हार्बर रेल्वेवरील सीएसएमटीकडे जाणारी लोकल ठप्प आहे.

मध्य रेल्वेवर ठाकुर्ली स्थानकाजवळ एलसी गेट उघडं रहिल्यामुळे वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे.

हार्बर मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत आहे. गोवंडी आणि चेंबूर स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला.

अप मार्गाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या बंद आहे. रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम सुरु असून काही वेळात वाहतूक पूर्ववत होण्याची चिन्हं आहेत.

आठवड्याचा पहिलाच दिवस असला, तरी नवीन वर्षानिमित्त काही जण सुट्टीवर आहेत, तर अनेकांना वर्षाच्या पहिल्या दिवसाची अधिकृत सुट्टी असल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी आहे. मात्र थर्टी फर्स्ट साजरा करुन घरी परतणाऱ्या किंवा ऑफिसला जाणाऱ्या काही प्रवाशांच्या दिवसाची सुरुवातच त्रासाने झाली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Central and Harbor railway delayed on first day of new year latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV