रमेश कदम शिवीगाळ प्रकरणाची पोलिस चौकशी होणार

रमेश कदम शिवीगाळ प्रकरणाची पोलिस चौकशी होणार

मुंबई : आमदार रमेश कदम शिवीगाळ प्रकरणाची पोलिस उपायुक्त स्तरावर चौकशी होणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हे आदेश दिले आहेत.

तुरुंगात असूनही रमेश कदम यांनी जेलमध्ये पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती.

या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी झोन 3 चे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार रमेश कदमांची मुजोरी कायम, पोलिसांना शिवीगाळ

सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, शिवीगाळ करणं या कलमांखाली रमेश कदम यांच्यावर कारवाई करण्याची तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे. पण त्याआधी नेमकं काय घडलं, याचा अहवाल देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात आणलं होतं. मात्र कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचं म्हणणं लिहून घेण्यास सांगितलं.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं.

पाहा व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV