मुंबईत चपलांच्या सोलमधून 38 किलो सोनं जप्त

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत भारतीय चलनानुसार जवळपास 11 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

मुंबईत चपलांच्या सोलमधून 38 किलो सोनं जप्त

मुंबई : मुंबईतल्या शिवडी डॉकमधील कंटेनरमधून कस्टम अधिकाऱ्यांनी 38 किलो सोनं हस्तगत केलं आहे. कंटेनरमध्ये असलेल्या चपलांच्या आत म्हणजे सोलमध्ये हे सोनं लपवण्यात आलं होतं.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत भारतीय चलनानुसार जवळपास 11 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याने कस्टम अधिकारीसुद्धा चक्रावून गेले आहेत.

रहमान एंटरप्रायझेसने चीनवरुन चपलांची आयात केली होती. संबंधित क्लिअरिंग एजंट कस्टमच्या काही विशेष अधिकाऱ्यांमार्फत 30 ते 40 कंटेनरमधून माल मागवतो. एजंटला यापूर्वीही तलवार आणि सिगरेटच्या तस्करीप्रकरणी अटक झाली होती.

दरम्यान, इतर कंटेनरमध्ये सोनं लपवण्यात आलं आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एकूण 50 किलोचं सोनं दडवलेलं असू शकतं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV