मुंबईत स्कूटरवरुन पडून टेम्पोखाली चिरडल्याने डॉक्टरचा मृत्यू

स्कूटरचा तोल जाऊन डॉक्टर खाली पडले. त्याचवेळी मागून आलेल्या टेम्पोनं त्यांना चिरडलं. यामध्ये डॉ. वझेंचा जागीच मृत्यू झाला

मुंबईत स्कूटरवरुन पडून टेम्पोखाली चिरडल्याने डॉक्टरचा मृत्यू

मुंबई : रस्ते अपघातात पुन्हा एकदा सामान्य मुंबईकराचा बळी गेला आहे. मुलुंडच्या आनंदनगर टोलनाका परिसरात स्कूटरवरुन पडल्यानंतर टेम्पोखाली चिरडून डॉक्टरचा मृत्यू झाला, तर कम्पाऊण्डर जखमी झाला आहे.

अपघातात डॉ. प्रकाश वझे यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टर वझे यांचा कंपाऊंडर नागप्पा हेगडे या अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरचा तोल जाऊन डॉक्टर खाली पडले. त्याचवेळी मागून आलेल्या टेम्पोनं त्यांना चिरडलं. यामध्ये डॉ. वझेंचा जागीच मृत्यू झाला, तर नागप्पा गंभीर जखमी झाला.

मुलुंड आणि ठाणे परिसरात बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळाच्या उपक्रमांच्या आयोजनासाठी डॉ. वझे प्रसिद्ध होते. वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ते अनेक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करायचे. त्यांची वझे स्पोर्ट्स अकादमी असून ते बुद्धिबळही शिकवायचे. मुलुंडला त्यांचं क्लिनिक आहे.

डॉ. वझे यांच्या अपघाती निधनामुळे मुंबई आणि ठाण्यातल्या क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Doctor dies after falling from scooter and hit by tempo latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV