मुंबईत अंधेरीमधील लाकडाच्या गोदामाला आग

पश्चिम रेल्वेच्या रुळाला लागूनच हे गोदाम असल्यामुळे लोकल रेल्वेला याची झळ पोहचण्याची भीती व्यक्त केली जात होती

मुंबईत अंधेरीमधील लाकडाच्या गोदामाला आग

मुंबई : मुंबईमध्ये आग लागण्याचं सत्र काही थांबता थांबत नाही. अंधेरीतील आंबोली भागात एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

एसव्ही रोडवर टिंबर मार्ट या लाकडाच्या गोदामाला ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 फायर इंजिन आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीचं कारण अद्यापही स्पष्ट नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या आगीत कोणीही अडकल्याचं वृत्त नाही.

पश्चिम रेल्वेच्या रुळाला लागूनच हे गोदाम असल्यामुळे लोकल रेल्वेला याची झळ पोहचण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र सध्या लोकलची वाहतूक सुरळीत सुरु आहे.

संबंधित बातम्या :


काळबादेवीतील सुवर्ण कारागीर व्यवसाय स्थलांतरित करा : मुख्यमंत्री


मुंबईच्या रे रोडवरील आगीत सात दुकानं जळून खाक


मुंबईतील सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्याला आग


सिनेव्हिस्टा आग : ऑडिओ असिस्टंटचा होरपळून मृत्यू


मुंबईतील गरीबनगरमध्ये आग लावणाऱ्या पिता-पुत्राला बेड्या


मुंबईत कांजूरमार्गमध्ये स्टुडिओला भीषण आग


अंधेरीत इमारतीला भीषण आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू


मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यूमुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Fire at wooden godown in Andheri’s Amboli latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV