मनसेच्या सुशांत माळवदेंना मारहाण करणारे कॅमेरात कैद

मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले होते.

मनसेच्या सुशांत माळवदेंना मारहाण करणारे कॅमेरात कैद

मुंबई : मालाडमधील मनसे पदाधिकारी सुशांत माळवदे यांना मारहाण झालेल्या प्रकरणाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. सुशांत माळवदेंना फेरीवाल्यांकडून मारहाण होतानाची दृश्यं कॅमेऱ्यात टिपली गेली आहेत.

मनसेतर्फे हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांनी केलेल्या मारहाणीत माळवदे जखमी झाले होते. त्यानंतर मारहाण करणाऱ्या दोघा जणांना मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने सुशांत माळवदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या 4 ते 5 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला.

मनसेकडून मुंबई आणि नवी मुंबईत रेल्वे स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचं काम केलं जात आहे. विविध स्टेशनांबाहेर फेरीवाल्यांना हटवण्यात आलं. मारहाणीच्या प्रकारानंतर फेरीवाल्यांविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली.

मुंबईसह पुण्यात मनसेनं फेरीवाल्यांविरोधात सफाई मोहीम सुरु केली. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर फेरीवाल्यांचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.संबंधित बातम्या :

जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Hawkers who beaten up MNS official Sushant Malawade caught on camera latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV