हायकोर्टाचा डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा

अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी डीएसकेंना 50 कोटी भरण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत.

हायकोर्टाचा डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा

मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दिलेल्या निर्देशांप्रमाणे 25 जानेवारीपर्यंत पैसे भरण्याची मुदत डी. एस. कुलकर्णी यांना वाढवून देण्यात आलीय. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी डीएसकेंना 50 कोटी भरण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत.

न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी डीएसकेंची सर्वत्र वणवण सुरू असल्याची कोर्टाला माहिती देण्यात आली. तपासयंत्रणांनी देशभरातील सर्व खाती गोठवल्याने अनेक अडचणी येत असल्याचं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाला सांगितलं. मात्र या पैशांची तजवीज पूर्ण झाल्याचे कागद सोमवारी हायकोर्टात सादर करण्यात आले.

प्रभुणे इंटरनॅशनल या डीएसकेंच्याच एका परदेशस्थ कंपनीमार्फत 80 लाख अमेरीकन डॉलर्स डीएसकेंच्या बँक ऑफ बडोदा या भारतीय बँकेतील खात्यात जमा करण्यात आले. 40-40 लाख अमेरीकन डॉलर्सचे दोन व्यवहार झाल्याचे पुरावे कोर्टासमोर ठेवण्यात आले. भारतीय चलनानुसार जवळपास ही रक्कम 51 कोटींच्या घरात आहे. मात्र ही रक्कम अजूनही डीएसकेंच्या भारतीय खात्यात जमा झालेली नाही.

येत्या 72 तासांत पैसे खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 25 जानेवारीपर्यंत हायकोर्टाने डीएसकेंना अखेरची संधी दिली आहे. तसेच या व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे तपास यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत. 25 जानेवारीला डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर हायकोर्टात पुन्हा होणार सुनावणी होईल.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai HC gave relief to DS kulkarni
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV