डहाणू हेलिकॉप्टर दुर्घटना, चार मृतदेह हाती

या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते.

डहाणू हेलिकॉप्टर दुर्घटना, चार मृतदेह हाती

मुंबई : ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणूजवळच्या समुद्रात सापडले आहेत. तसंच हेलिकॉप्टरमधील बेपत्ता झालेल्या सातपैकी चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

ओएनजीसीच्या डाऊफिन एएस 365 एन3 या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते.

ह्या हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी जुहू इथून उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ओएनजीसीच्या समुद्रातील लॉन्चपॅडवर पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु समुद्रात 30 नॉटिकल मैल अंतरावर असताना, सकाळी 10.35 वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.

यानंतर तटरक्षक दलाने शोध मोहिम हाती घेतली.  तर नौदलाच्या काही बोटी आणि विमानं डायव्हर्ट करुन हेलिकॉप्टरचा शोध सुरु घेत होते. याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोल सातत्याने हेलिकॉप्टरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतं. अखेर त्याचे अवशेष समुद्रात आढळले.

दरम्यान, बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर ओएनजीसीचंच असल्याचं स्पष्ट झालं. कंपनीने करार केल्याने पवनहंस हेलिकॉप्टर पाच ते सहा वर्षांपासून ओएनजीसीसोबत काम करत होतं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Helicopter with 7 people on board, including ONGC employees goes missing
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV