लालबाग पुलाच्या कंत्राटदारांवर काय कारवाई? : मुंबई हायकोर्ट

आयआयटी मुंबईची मदत घेऊन लालबाग पुलासंदर्भात योग्य ते उपाय तातडीनं करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

Mumbai High court asks about action against Lalbaug flyover contractor latest update

मुंबई : मुंबईतील लालबाग पुलाच्या डागडुजीचे काम 15 फेब्रुवारी 2018 पर्यंत पूर्ण करा, अशी सक्त ताकीद मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला दिली आहे. तसंच या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात काय कारवाई केली? असा सवालही हायकोर्टानं विचारला आहे.

आयआयटी मुंबईची मदत घेऊन यासंदर्भात योग्य ते उपाय तातडीनं करा, असे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत.
या पुलाच्या डागडुजीचे काम मुंबई महापालिकेनं हाती घेतलं आहे. पुलाच्या दोन लेनवर डांबरचा थर टाकला जाणार आहे.

पिलरचे सांधे भरणं, पिलर मजबूत करणं, पुलाखालचा भाग मजबूत करणं ही कामं केली जाणार आहेत. यासाठी 13 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

याविरोधात जनहित मंचचे भगवानची रयानजी यांनी जनहित याचिका केली आहे. स्ट्रक्चरलर ऑडिट रिपोर्ट केल्याशिवायच हे काम सुरु होणार आहे. या कामासाठी 13 कोटी रुपयांचा खर्च अधिक आहे. हे गैर आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

‎या पुलाचे बांधकाम 2010 मध्ये झाले. बांधकाम सुरु असतानाच पुलाचा काही भाग कोसळला होता. पुल सुरु झाल्यानंतर त्यावर खड्डे पडले. गेल्या वर्षी पुलाच्या दोन स्लॅबमध्ये गॅप आढळला. ऑडिट केल्याशिवाय पुलाचे काम करु नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याकरता कोणती संस्था नेमली आहे, असे आदेश न्यायालयाने दिले. यासंदर्भातील पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai High court asks about action against Lalbaug flyover contractor latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय नाही, आमदारांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय नाही, आमदारांना उद्धव ठाकरेंचं...

मुंबई : सत्तेतून बाहेर पडण्यावरुन शिवसेनेत गटबाजीला उधाण आलं आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यात ऐतिहासिक दिरंगाई

मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव
मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात...

मुंबई : भायखळा कारागृहातील कैद्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा

2008 मालेगाव स्फोट : मेजर रमेश उपाध्यायला जामीन
2008 मालेगाव स्फोट : मेजर रमेश उपाध्यायला जामीन

मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या

घाटकोपर दुर्घटना : शितपच्या जामिनावर सुनावणीस हायकोर्टाचा नकार
घाटकोपर दुर्घटना : शितपच्या जामिनावर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपनं

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

राणेंच्या प्रवेशावर अमित शाहांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा?
राणेंच्या प्रवेशावर अमित शाहांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा?

मुंबई : नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत भाजप आणि

वाहतूक पोलिसावर हात उचलणारा सोहेल मेमन ड्रग्स रॅकेटमध्ये गजाआड
वाहतूक पोलिसावर हात उचलणारा सोहेल मेमन ड्रग्स रॅकेटमध्ये गजाआड

वसई : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या नालासोपारा युनिटने अंमली

राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेनेच्या अरविंद भोसलेंवर गुन्हा
राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेनेच्या अरविंद भोसलेंवर गुन्हा

मुंबई : नारायण राणे यांच्या विरोधात केलेली पोस्टरबाजी शिवसेनेच्या

‘मुलगा जिवंत पाहिजे, तर 50 लाख रुपये द्या’, एका बोगस अपहरणाची पोलखोल
‘मुलगा जिवंत पाहिजे, तर 50 लाख रुपये द्या’, एका बोगस अपहरणाची पोलखोल

पालघर : मित्रांची संगत, किंमती मोबाईल, फिरण्याची हौस या साऱ्यांमुळे