संजय दत्तला नियमानुसार पॅरोल-फर्लो, मुंबई हायकोर्टाचा दिलासा

संजय दत्तला सामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक दिली गेली होती. त्याला मिळणारे पॅरोल आणि फर्लोही नियमानुसार होते, असा दावा सरकारने केला होता.

संजय दत्तला नियमानुसार पॅरोल-फर्लो, मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : अभिनेता संजय दत्तला पॅरोल आणि फर्लोची शिक्षा देताना कोणतेही नियम मोडलेले नाहीत, असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने निर्वाळा दिल्यामुळे संजय दत्तसह राज्य सरकारलाही दिलासा मिळाला आहे.

1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आठ महिने आधीच त्याची सुटका झाली. शिक्षेच्या काळात त्याला वारंवार मिळणाऱ्या सुट्ट्यांवर सवाल उपस्थित करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली.

पाच वर्षांपैकी 18 महिन्यांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती, तर उर्वरित शिक्षा त्याने नुकती पूर्ण केली. मात्र पाच वर्ष पूर्ण होण्यास आठ महिन्यांचा अवधी असताना त्याची सुटका करण्यात आली. शिक्षेच्या काळात त्याने पॅरोल आणि फर्लो मिळून 118 दिवस जेलबाहेर काढले होते, यावरुन सरकारला लक्ष्य केलं जात होतं.

जस्टिस एस सी धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. गृहखात्याकडून वैध कागदपत्रांची पूर्तता झाल्याचं समर्थन करण्यात राज्य सरकारला यश आलं आहे.

संजय दत्तला सामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक दिली गेली होती. त्याला मिळणारे पॅरोल आणि फर्लोही नियमानुसार होते, असा दावा सरकारने केला होता.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai High Court grant big relief to Sanjay Dutt and State government latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV