ब्लू व्हेल प्रकरणात मुंबई हायकोर्टाने फेसबुक, गुगलला फटकारलं

जीवघेणा ऑनलाईन गेम 'द ब्लू व्हेल' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Mumbai high court orders to file affidavit in the blue whale game PIL

मुंबई : ‘द ब्लू व्हेल’ गेम प्रकरणात दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणीत, फेसबुक आणि गुगल दोन्ही कंपन्यांना मुंबई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिवादींना पाठवलेली नोटीस काल म्हणजे बुधवारी फेसबुक आणि गुगलच्या भारतातील पत्त्यांवर मिळाली असल्याने उत्तर देण्यास दोन्ही कंपन्यांनी वेळ मागून घेतली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फेसबुक आणि गुगल दोघांनाही फटकारलं. “इथे मुलांचे जीव जात आहेत आणि आपण याबाबत अजिबात गंभीर दिसत नाहीत” त्यामुळे आपण लवकरात लवकर आपलं उत्तर सादर करा, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

जीवघेणा ऑनलाईन गेम ‘द ब्लू व्हेल’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी या याचिकेत गुगल, फेसबुक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर सेललाही प्रतिवादी बनवलं आहे.

प्रशासनाने द ब्लू व्हेल गेमशी संबंधित तक्रारी आणि समस्यांसाठी एक हेल्पलाईन सुरु करावी. जेणेकरुन या गेमच्या आहारी जाणारी लहान मुलं तसेच त्यांच्या पालकांना यासंदर्भात तातडीने मदत करता येईल, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

या प्रकरणात आज मुंबई सायबर सेल आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायच होतं, मात्र सायबर सेल आणि राज्य सरकारकडून कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे याबाबत सरकारही फारसं गंभीर नसल्याचंदेखील समोर आलं आहे.

रशियातून उदयास आलेल्या या गेममध्ये खेळणारा आणि त्याचा अदृश्य मार्गदर्शक यांच्यात अजाणतेपणी एक दृढ नातं निर्माण होतं. ठराविक टप्यानंतर खेळणाऱ्याला त्याचा मार्गदर्शक एक-एक काम सांगत जातो. पुढच्या टप्यावर पोहचण्यालाठी ते काम पूर्ण करुन त्याचा पुरावा देणं खेळणाऱ्याला बंधनकारक असतं. या खेळात शेवटच्या टप्यावर खेळणाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai high court orders to file affidavit in the blue whale game PIL
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत
नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत

मुंबई : गरीब कुटुंबातील लहान मुलांना अवघ्या काही हजारात विकत घेऊन

शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे
शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे

डोंबिवली : शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा

सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना विनंती करणार
सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना...

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्या शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका
शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका

मुंबई: नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक

एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन
एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं

ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला सक्त ताकीद
ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला...

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या बाबतीत यंदा कोर्टालाच तारीख

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले

मुंबई : शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये आणि जरी शिवसेना बाहेर

55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास
55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

मुंबई : 55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाला

रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या
रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या

कल्याण : कल्याणजवळच्या बदलापूरमध्ये एक तरुण आणि तरुणीने

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची