फेरीवाल्यांसाठी हायकोर्टात दाद मागणाऱ्या निरुपम यांना दणका

मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारित फेरीवाल क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी आहे.

फेरीवाल्यांसाठी हायकोर्टात दाद मागणाऱ्या निरुपम यांना दणका

मुंबई : फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागणाऱ्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दणका बसला आहे. मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.

फेरीवाल्यांना यापुढे मुंबईसह राज्यभरात त्यांच्यासाठी आखून दिलेल्या फेरीवाला क्षेत्रातच आपला व्यवसाय करता येणार असल्याचं मुंबई हायकोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

निरूपमांसह राज्यभरातील विविध फेरीवाला संघटनांनी पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. अधिकृत फेरीवाल्यांचं सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालं नसल्याने अधिकृत फेरीवाले कोणते आणि अनधिकृत कुठले हे ठरलं नसल्याने फेरीवाल्यांविरोधात कारवाई न करण्याची निरुपम यांची मागणीही कोर्टाने फेटाळली आहे.
सर्वेक्षण न झाल्याची सबब पुढे करत फेरीवाल्यांना कुठेही व्यवसाय करु देण्याची निरुपम यांच्या मागणीला हाकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. रेल्वे पादचारी पूलांवर व्यवसाय करता येणार नाही हेही  हायकोर्ट विशेष नमूद केलं आहे. शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयं यांच्या 100 मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई आहे. धार्मिक स्थळांच्या बाहेर मात्र केवळ पूजेचं साहित्य विकण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. तर रेल्वे स्टेशन, मनपा मंडई यांच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई आहे.


2015 साली न्यायमूर्ती अभय ओक या संदर्भातला आदेश दिला होता. 1 मे 2014 पूर्वी ज्यांची नोंद फेरीवाले म्हणून करण्यात आली तेच अधिकृत फेरीवाले म्हणून मुंबईत व्यवसाय करु शकणार आहे. तो आदेश आज मुंबई हायकोर्टाने कायम ठेवला आहे.

कुठे-कुठे फेरीवाल्यांना मनाई

- शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या 100 मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना मनाई

- रेल्वे स्टेशन, पालिका मंडईच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई

- रेल्वे पादचारी पुल, स्काय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई

दादरमध्ये मनसे आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले!

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ दादरमध्ये काढलेल्या मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा होऊ शकला नाही.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आज सकाळी दादरमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. परंतु यावेळी मनसे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर बटाटे फेकून विरोध केला.

संबंधित बातम्या

दादरमध्ये काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले!

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा दादरमध्ये मोर्चा

काँग्रेस फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार!

जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट 

… तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात


दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला 

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai high court rejects Sanjay Nirupam’s petition in favour of hawkers
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV